पुण्यात मंत्री नितीन गडकरींचा सन्मान ; लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

पुणे : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करणार आहे. गडकरी यांच्या राष्ट्रनिर्मितीतील योगदानाबद्दल हा पुरस्कार त्यांना देण्यात येत आहे. एक ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा पुरस्कार देण्यात येईल.त्यांच्या या पुरस्कार वितरण कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार, एकनाथ शिंदे, अजित पवार, चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत.

लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष रोहित टिळक यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाची घोषणा केली आहे. दरवर्षी पुण्यात १ ऑगस्टला लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टवतीने पुरस्कार दिला जातो. यंदाचा लोकमान्य टिळक पुरस्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जाहीर करण्यात आला आहे. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराची सुरुवात लोकमान्य टिळक ट्रस्टतर्फे लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीला १ ऑगस्ट १९८३ पासून करण्यात आली. १ लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असते. १९८३ पासून राष्ट्रीय पातळीवरील हा पुरस्कार देण्यात येतो.

लोकमान्य टिळक पुरस्कारचे आतापर्यंतचे मानकरी –

गोदावरी परुळेकर
इंदिरा गांधी (मरणोत्तर)
श्रीपाद अमृत डांगे
अच्युतराव पटवर्धन
खान अब्दुल गफार खान (मरणोत्तर)
सुधाताई जोशी
मधु लिमये
बाळासाहेब देवरस
पांडुरंगशास्त्री आठवले
शंकर दयाळ शर्मा
अटलबिहारी वाजपेयी
टी. एन. शेषन
डॉ. रा. ना. दांडेकर
डॉ. मनमोहन सिंग
डॉ. आर. चिदम्बरम
डॉ. विजय भटकर
राहुल बजाज
प्रा. एम. एस. स्वामिनाथन
डॉ. वर्गीस कुरियन
रामोजी राव
एन. आर. नारायण मूर्ती
सॅम पित्रोदा
जी. माधवन नायर
डॉ. ए. सिवाथानू पिल्लई
मॉन्टेकसिंग अहलुवालिया
प्रणब मुखर्जी
शीला दीक्षित
डॉ. कोटा हरिनारायण
डॉ. विकास आमटे आणि डॉ. प्रकाश आमटे
डॉ. ई. श्रीधरन
डॉ. अविनाश चंदेर
सुबय्या अरुणन
शरद पवार
आचार्य बाळकृष्ण
डॉ. के. सिवन
बाबा कल्याणी
सोनम वांगचूक
डॉ. सायरस पूनावाला
डॉ. टेस्सी थॉमस
पंतप्रधान नरेंद्र मोदी
सुधा मूर्ती
