ऐ बस खाली तुला शेतातल काय कळतय र…!! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आदित्य ठाकरेंना टोला…!


मुंबई : सध्या मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार टीका सुरू आहेत. यावेळी विरोधी आमदारांनी कांदा, कापूस, हरभरा, द्राक्ष उत्पादकांच्या प्रश्नावर तातडीने चर्चा करावी अशी मागणी लावून धरली होती. यामुळे गोंधळ झाला होता.

नाफेडसारख्या संस्थांना शेतमाल खरेदी करण्याच्या सूचना द्या, राज्य सरकारने केंद्र सरकारशी समन्वय साधावा अशी मागणी अजित पवार यांनी केली होती. बाकी चर्चा बाजूला राहुद्या. शेतकरी हवालदिल झाला असून महाराष्ट्रात सर्वाधिक कांदा पिकतो. मात्र कांद्याला सर्वात कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे असे पवार म्हणाले.

यानंतर मुख्यमंत्री बोलायला लागले. असे असताना आदित्य ठाकरे यांनी त्यांच्याकडे पाहून काही बोलण्यास सुरवात करताच एकनाथ शिंदे यांनी ऐ, बस खाली.. तुला शेतीतलं काय कळंतय? असा टोला मारला.

यानंतर शिवसेनेचे सर्व आमदार हसू लागले. आदित्य यांना टोला लगावूनही ठाकरे गटाचे आमदार शांतच बसले.यामुळे एक वेगळेच चित्र सभागृहात दिसले. यानंतर मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलू लागले.

या प्रश्नोत्तरानंतर सभागृह व विधीमंडळाच्या आवारात शिंदे यांनी आदित्य ठाकरेंना लगावलेल्या टोल्याचीच चर्चा अधिक होती. एकनाथ शिंदे ठाकरे यांच्यापासून बाजूला झाल्यापासून अनेकदा असे प्रसंग येत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!