भोऱ्याची लोकप्रियता रातोरात वाढली ! मुख्यमंत्र्यांनी भेट घेत केले कौतुक….!
जालना : प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शाळेत भाषण केलं आणि तो राज्यभर ओळखला जाऊ लागला. कार्तिक ऊर्फ भोर्याच्या बाबतीत हे घडले आहे. त्याने भाषण करून लोकशाहीची व्याख्या सांगितली आणि तो राज्यात ओळखला जाऊ लागला.
आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील त्याचे कौतुक केले आहे. पहिलीच्या वर्गात शिकणाऱ्या भोऱ्याने देशातील लोकशाही आपल्या शैलीत सांगितल्यानंतर त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव झाला.
त्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याच्या विनोदी भाषणाचा व्हिडिओ अनेकांनी शेअर केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील त्याचे भाषण पाहिले.
मुख्यमंत्र्याचे स्वीय सहाय्यक यांनी व्हिडिओ कॉलद्वारे त्याच्याशी संवाद साधला. मुख्यमंत्री यांनी भोर्या व त्याचे वडील यांना 2 फेब्रुवारीला वाटूर फाटा येथे भेटायला येण्याचे निमंत्रण दिले होते, आणि मुख्यमंत्री आज त्याला भेटले.
त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राज्यभर त्याच्या भाषणाची चर्चा झाली. कार्तिक ऊर्फ भोर्या रेवलगाव (ता.अंबड जि. जालना) येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत आहे.