मोठी बातमी! मंत्री छगन भुजबळ यांचे हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी दुसऱ्याच ठिकाणी उतरले, मोठी दुर्घटना घडणार तेवढ्यात…


पुणे : गेल्या काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची घटना घडली होती. यामध्ये त्यांचे दुर्दैवी निधन झाले होते. यानंतर हवाई प्रवासावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. असे असताना आज एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

आज मंत्री छगन भुजबळ यांचे हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी दुसऱ्याच ठिकाणी उतरले, यामुळे मोठा अपघात टळला आहे. कार पार्किंगमध्ये हे हेलिकॉप्टर उतरल्याने मोठी खळबळ उडाली. हेलिपॅडचा अंदाज न आल्याने पायलटकडून ही चूक घडली आहे. यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.

याबाबत आमदार रोहित पवार म्हणाले, छगन भुजबळ साहेब यांच्यासारख्या मोठ्या नेत्याचं हेलीकॉप्टर हेलिपॅडऐवजी अचानक एका पार्किंगमध्ये उतरवण्यात आल्याची बाब ही अतिशय गंभीर आहे. त्यामुळंच मी सातत्याने सांगतोय की, महत्त्वाच्या व्यक्तींनी प्रवास करताना काळजी घ्यायला हवी.

अनेक विमानं आणि हेलिकॉप्टरर्समध्ये देखभाल दुरुस्तीसह इतरही अनेक त्रुटी आहेत. आज सुदैवाने अपघात टळला पण म्हणून शासनानेही एवढा हलगर्जीपणा करणं योग्य नाही. विमान, हेलीकॉप्टर्सने प्रवास करताना सरकार यापुढं काळजी घेईल, ही अपेक्षा. असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.

दरम्यान, अजित पवार यांच्या विमान अपघाताला अजून काही दिवस पूर्ण झाले नसताना ही घटना घडल्याने चर्चेना उधाण आले आहे. यामुळे येणाऱ्या काळात याबाबत प्रशासनाने काळजी घेणे आवश्यक आहे. याबाबत आमदार रोहित पवार सातत्याने आवाज उठवत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!