मंत्री छगन भुजबळ इंदापूरमध्ये महावितरणच्या अधिकाऱ्यांवर भडकले, पत्रकार परिषदेत लाईट ये-जा करत असल्याने व्यक्त केला संताप…


इंदापूर : राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आज पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. असे असताना त्यांची पत्रकार परिषद सुरू असताना लाईट सतत ये जा करत होती.

यामुळे छगन भुजबळ चांगलेच संतापले. या ठिकाणी उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यावर त्यांनी राग काढला. यावेळी ते म्हणाले, नेमकं चाललय काय? लाईट दहा सेकंद येते दहा सेकंद जाते. तुम्हाला बंद करायचे आहे ना तर बंदच करा.

असे म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला. यावेळी महावितरणच्या कर्मचाऱ्याने तत्काळ लगेच महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून लाईट बंद न करण्याच्या सूचना केल्या. या प्रकरणामुळे मात्र छगन भुजबळ यांना राग अनावर झाला.

इंदापूरमध्ये दर गुरुवारी महावितरण कडून थोडफार प्रमाणात लाईट घालवली जाते. असे असताना आजच मंत्री छगन भुजबळ इंदापूर दौऱ्यावर होते. लाईट यावेळी सतत जात होती. यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला. यामुळे याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत राज्यातील इतर प्रश्नांबाबत खुलासा केला. मात्र या पत्रकार परिषदेत त्यांनी कृषी मंत्र्यांचा राजीनामा, जरांगे पाटील यांचे आंदोलन, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा यावर कोणतेही सविस्तर उत्तर दिलं नाही. नंतर ते पुढील दौऱ्यावर मार्गस्थ झाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!