Milk Price : अमूल दूध महागलं, आजपासून लागू होणार नवे दर, जाणून घ्या नेमकं किती रुपयांची झाली वाढ…
Milk Price : लोकसभा निवडणूक निकालाची धामधूम सुरु असतानाच दुधाच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. सोमवारपासून अमूल दुधाच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. अमूल गोल्ड, अमूल शक्ती, अमूल टी स्पेशल दुधाच्या दरात वाढ करण्यात आली आहे.
आता अमूल गोल्डची किंमत ६४ रुपये/लिटरवरून ६६ रुपये/लिटर होणार आहे. तर अमूल टी स्पेशलची प्रतिलिटर किंमत ६२ रुपयांवरून ६४ रुपयांपर्यंत वाढणार आहे. एवढेच नाही तर अमूल शक्तीचा भाव ६० रुपयांवरून ६२ रुपये प्रतिलिटरपर्यंत वाढणार असून, दह्याचे दरही वाढले आहेत.
GCMMF ने आज जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात सांगितले की, एकूणच ऑपरेशन आणि दुधाचे उत्पादन खर्च वाढल्याने दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. किमती वाढल्याने अमूलच्या तिन्ही प्रमुख दुधाच्या प्रकारांवर परिणाम होईल. अमूल गोल्ड, अमूल शक्ती, अमूल टी स्पेशल याच्या किंमतीत वाढ कऱण्यात आली आहे. असे GCMMF ने म्हटले आहे. Milk Price
लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच अमूलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. नवीन दरांनुसार, अमूल गोल्ड ५०० मिली आता ३२ रुपयांऐवजी ३३ रुपयांना मिळणार आहे.अमूल ताजा म्हणजेच टोन्ड दूध ५०० मिलीची किंमत २६ रुपयांवरून २७ रुपये करण्यात आली आहे.
अमूल शक्ती ५०० मिलीची किंमत २९ रुपयांवरून ३० रुपयांपर्यंत वाढली आहे. अमूल ताजा स्मॉल सॅचेट्सच्या किमतीत कोणतीही वाढ झालेली नाही. इतर सर्व प्रकारच्या दुधाच्या दरात दोन रुपयांनी वाढ झाली आहे.
दरम्यान, अमूल गोल्डचे ५०० मिली पॅकेट आता ३२ रुपयांऐवजी 33 रुपयांना मिळणार आहे. अशाप्रकारे एक लिटरच्या दरात दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. अमूल शक्ती पॅक ३० रुपयांना आणि अमूल ताझा २७ रुपयांना उपलब्ध असेल.
अमूल दूध पूर्वी ६४ रुपये प्रतिलिटर दराने उपलब्ध होते, आता त्याची किंमत ६६ रुपये झाली आहे. ही वाढ 14 महिन्यांनंतर झाली आहे, कारण 1 एप्रिल २०२३ रोजी गुजरातमध्ये अमूल दुधाच्या दरात प्रति लिटर २ रुपयांनी वाढ करण्यात आली होती.