Milk Price : गोकुळकडून दुधाच्या दरात वाढ, मुंबईसह पुणेकरांना फटका, किती झाली वाढ? जाणून घ्या…


Milk Price : पुणे, मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागणारी बातमी आहे. मुंबई आणि पुणे शहरात मिळणारे दूध आता महाग झाले आहे. कारण गोकुळ दूध संघानं गाईच्या दुधाच्या विक्री दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

दुधाची ही दरवाढ फक्त पुणे आणि मुंबई या ठिकाणीच असणार आहे. १ जुलैपासून गाईच्या दुधामध्ये प्रति लिटर दोन रुपयांनी वाढ केली आहे. गोकुळ दूध संघाच्या गाईच्या दुधाला पुणे आणि मुंबईमध्ये मोठी मागणी आहे. पुणे आणि मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रामध्ये विक्री दरात कोणतीही वाढ नाही.

जून महिन्याच्या सुरुवातीला मदर डेअरीकडून दुधाच्या दरात प्रति लिटर २ रुपये वाढ करण्यात आली होती. तर अमूलने देखील आपल्या दूध दरात प्रति लिटर २ रुपयांनी वाढ केली होती. त्यानंतर कर्नाटक मिल्क फेडरेशनकडून नंदिनी या दुधाचे दर वाढवले होते. आता गोकुळने दुधाच्या दरात वाढ केली आहे. Milk Price

गोकुळ दूध संघानं मोठा निर्णय घेतला. गाईच्या दुधाच्या दरात दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही वाढ फक्त मुंबई आणि पुणे या ठिकाणीच असणार आहे. पुणे आणि मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रामध्ये विक्री दरात कोणतीही वाढ करण्यात आली नसल्याची माहिती गोकुळकडून देण्यात आली आहे. दरम्यान, या दूध दरवाढीचा ताण मुंबई आणि पुणेकरांना पडणार आहे.

दरम्यान, मुंबई आणि पुणे शहरात मिळणारे गोकुळचे दूध महाग झाल्यामुळे सर्वसामान्यांचे महिन्याचे बजेट कोलडणार आहे. आता दुधासाठी त्यांना जास्त खर्च करावा लागणार आहे. वाढता खर्च आणि दूध पावडरीमध्ये होणाऱ्या तोट्यामुळे दर वाढ केली असल्याचे सांगितले गेले.

या दरवाढीमुळे उत्पादक आणि संघाला हातभार लागणार आहे. पुणे, मुंबईत गाईच्या दुधाची विक्री याआधी प्रतिलिटर ५४ रुपये दराने होत होती. आता हा दर प्रतिलिटर ५६ रुपये असा झाला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!