Microsoft Outage : तुमचाही लॅपटॉप बंद पडलाय? मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड, जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं…


Microsoft Outage : मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड झाल्याने जगभरातील यूजर्सना अडचणींचा सामना करावा लागतो आहे. अनेकांचे संगणक आणि लॅपटॉप अचानक बंद पडत असून त्यावर निळ्या रंगाची स्क्रीन दिसत आहे.

यामुळे जगभरातील बॅंका आणि विमानतळांचं कामदेखील खोळंबलं आहे. महत्त्वाचे म्हणजे मायक्रोसॉफ्टनेही या घटनेची दखल घेतली असून याबाबत आम्ही माहिती घेत असल्याचे कंपनीने म्हटलं आहे.

क्स या समाजमाध्यावर पोस्ट शेअर करत अनेक यूजर्सने याबाबत तक्रार केली आहे. काम करत असताना अचानक त्यांचे लॅपटॉप बंद पडत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. तसेच तुमचा संगणक अडचणीत असून रिस्टार्ट करणे आवश्यक आहे, असे संदेश स्क्रीनवर येत असल्याचेही या यूजर्सने सांगितले आहे. क्राऊड स्क्राइक अपडेटनंतर येत आहे, ही समस्या येत असल्याची तक्रारही काही यूजर्सद्वारे करण्यात करण्यात आली आहे. Microsoft Outage

या समस्येमुळे जगभरातील मायक्रोसॉफ्ट विंडोजवर चालणारे लॅपटॉप आणि संगणक प्रभावित झाले आहेत. क्राउड स्ट्राईकने या प्रकरणाची दखल घेत समस्येची चौकशी सुरू केली आहे. क्राउड स्ट्राईकच्या प्रतिनिधीने एक विधान जारी केले आहे की विंडोज चालवणा-या मशीनवर बीएसओडी समस्या निर्माण झाली आहे.

जर तुम्हाला तुमच्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपमध्ये ब्लू स्क्रीन ऑफ डेथ (बीएसओडी) ची समस्या येत असेल तर तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. लक्षात ठेवा की कोणत्याही परिस्थितीत आपण स्वत:हून या समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न करू नये. तांत्रिक सूचना येण्याची वाट पहा. क्राउड स्ट्राईकसध्या या समस्येचे निराकरण करण्यासाठी काम करत आहे आणि लवकरच तुम्हाला अपडेट करेल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!