मायकल क्लार्कच्या गर्लफ्रेंड ने मारली कानशिलात ; व्हिडिओ वायरल…!

नवी दिल्ली : ओस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सध्या त्याच्या गर्लफ्रेंड सोबत झालेल्या भांडणाच्या व्हिडिओ मुळे चर्चेचा विषय बनत आहे.
सोशल मीडिया मध्ये एक व्हिडिओ वायरल झाला आहे, ज्यामध्ये मायकल क्लार्कला त्याची गर्लफ्रेंड कानाखाली मारताना दिसत आहे. नंतर ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटूने आपल्या गर्लफ्रेंडच्या बहिणीच्या नव-याला धक्काबुक्की केल्याचेही पाहायला मिळाले.
मायकल क्लार्कचा गर्लफ्रेंडसोबत झालेल्या भांडणाचा व्हीडीओ कॅमे-यात कैद झाला असून, त्याच्यावर फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
व्हीडीओमध्ये क्लार्क आपल्यावरील सर्व आरोप खोटे असल्याचे सांगताना ऐकू येत आहे.
रिपोर्टनुसार, हा व्हीडीओ त्यावेळचा आहे जेव्हा ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार सुटी एन्जॉय करत होता. त्यादरम्यान त्याच्या गर्लफ्रेंडशिवाय त्याची बहीण जास्मिन आणि तिचा पती कार्ल स्टेफानोविक देखील तिथे होते.