Mharashtra Politics : मुख्यमंत्री पदावरून महायुतीमध्ये घुसपुस! फडणवीसांची ताकद अन् शिंदेंची नाराजी, नेमकं कोण ठरणार वरचढ…


Mharashtra Politics : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीची सरशी झाली. विधानसभा निवडणुकीत तमाम राजकीय विश्लेषक आणि बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांच्या अंदाजापेक्षाही उत्तम कामगिरी करत महायुतीने जोरदार मुसंडी मारली.

महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांना मिळून २३४ जागा मिळाल्या असून, यामध्ये भाजपला १३२ जागा मिळाल्या आहेत, त्यामुळे भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. आता मुख्यमंत्री कोण होणार, याची चर्चा सुरू आहे. एकनाथ शिंदे यांना पुन्हा संधी मिळणार की, मुख्यमंत्रिपदाची धुरा देवेंद्र फडणवीसांकडे जाणार याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.

मात्र मुख्यमंत्री पदाबाबत शिवसेना आणि भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात अंतर्गत धुसफूस सुरू असल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करावे यासाठी त्यांच्या समर्थकांकडून दबाव वाढला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस असावेत यासाठी अजित पवारांकडून पाठिंबा असल्याचे बोलले जातेय. अजित पवार गटाचे ४१ आमदार निवडून आले आहेत. Mharashtra Politics

तसेच देवेंद्र फडणवीस यांना ५ अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिल्याने भाजपाचे संख्याबळ १३७ वर पोहोचले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या करिष्म्याची ताकद भाजपा पक्षश्रेष्ठींना चांगली ठाऊक आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पदी फडणवीसांचे नाव आघाडीवर दिसतेय.

तर दुसरीकडे यंदाची विधानसभा निवडणूक माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढवली गेली. त्यातच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे राज्यात महायुतीला घवघवीत यश मिळाले.

यामुळे मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे हेच दावेदार आहेत, असा वाढता दबाव एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांकडून करण्यात येत असल्याचे दिसत आहे. आपल्या नेतृत्वातच महायुतीला भक्कम यश मिळाल्याने मुख्यमंत्रीपदाची माळ आपल्याच गळ्यात पडावी, असा एकनाथ शिंदे यांचा आग्रह आहे. भाजपाला कुठल्याही परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे यांना नाराज करायचे नाही. त्यामुळे आता भाजपा पक्षश्रेष्ठी कशा पद्धतीने तोडगा काढतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!