मुलुंडमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळला; एक मृत तर तिघेजण जखमी, मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश..


मुंबई : मुंबईतील मुलुंड येथील एलबीएस रोडवर मेट्रो पिलरचा सिमेंट स्लॅब कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत स्लॅब एक ऑटो रिक्षा आणि चार चाकी गाडीवर कोसळला असल्याने एक व्यक्ती मृत झाली असून तिघेजण जखमी झाले आहेत. दरम्यान जखमीची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, मुलुंड येथील एलबीएस रोडवर मेट्रो पिलर चा सिमेंटचा मोठा भाग रिक्षावर कोसळल्याने अनेक जण जखमी झाले आहेत. जखमीना तात्काळ जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती लक्षात घेऊन आवश्यक ती सर्व वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली जात आहे.

दरम्यान मेट्रो प्रकल्पाची टीम घटनास्थळी दाखल असून मुंबई महापालिका प्रशासन,मुंबई अग्निशमन दल आणि मुंबई ट्रॅफिक पोलीस व आपत्ती व्यवस्थापन यंत्रांच्या समन्वयाने मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. या गंभीर घटनेची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखाची मदत जाहीर केली आहे.तसेच या घटनेच्या चौकशीची आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान मुलुंडमध्ये मेट्रोच्या बांधकामाचा स्लॅब कोसळल्याची घटना अचानक घडली. ज्या मेट्रोचा स्लॅब कोसळला त्या ठिकाणची चौकशी करण्यात येत आहे. या घटनेनंतर ठाण्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळासाठी बंद ठेवण्यात आली आहे. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांकडून दिले जात आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!