पुण्यात अतिवृष्टीचा इशारा! हवामान विभागाची मोठी माहिती, काळजी घेण्याचे आवाहन…


पुणे : गेल्या काही दिवसांपासून सगळेजण पावसाची वाट बघत होते. आता सर्वत्र पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक दिवसांच्या पावसाच्या प्रतीक्षेत असणारा बळीराजा सुखावला आहे.

असे असताना आता हवामान खात्याने काही जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. यामुळे काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुण्यामध्ये पुढील 4-5 दिवस मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

त्यामुळे तेथील रहिवाशांना सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आज रात्री जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. अतिवृष्टी देखील होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

दरम्यान, पुणे शहर आणि आसपासच्या भागात अतिवृष्टी होणार आहे. दरम्यान, मुंबई, पुणे, नागपूर, नाशिकसह महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाने थैमान घातले असून आणखी 5 दिवस या भागात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे आता शेतीच्या कामांना वेग येणार आहे.

हवामान खात्याने काही जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. यावर्षी मान्सून उशिरा दाखल झाला आहे. यामुळे शेतकरी चिंतेत होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!