धक्कादायक! मतिमंद मुलीवर अनेकदा बलात्कार, मुलगी गर्भवती राहिली अन्…
वाई : तालुक्यातील आनेवाडी टोलनाका परिसरातील एका गावातील शेतात गतीमंद मुलीवर जबरदस्तीने अनेकदा बलात्कार करून ती गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक घटना उघडकीस आली.
या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीला थेट मुंबई गाठून त्याला अटक करून न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कुठली दिली आहे.
शुभम बाळकृष्ण निकम (वय. ३८ राहणार मालुसरेवाडी ता.जावली) असे आरोपीचे नाव असून याच्या विरोधात पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी भुईंज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
सदाशिव पेठ तरूणी हल्ला प्रकरण! पोलीस हवालदारांसह तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर मोठी कारवाई
मिळालेल्या माहिती नुसार, आनेवाडी टोलनाका परिसरातील एका गावातील मतिमंद मुलगी ही दररोज एकटीच शेळ्या चारण्यासाठी जात होती. याची माहिती मालुसरेवाडीतील शुभम बाळकृष्ण निकम याला २०२२ रोजीच्या डिसेंबर महिन्यात समजली.
ती शेतात एकटीच असल्याचा गैरफायदा घेऊन त्याने त्या गतीमंद मुलीला शेतातील आडोशाला जबरदस्तीने नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध बलात्कार केला.
पहाटेचा शपथविधी शरद पवारांच्या बैठकीनंतरच!! देवेंद्र फडणवीसांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट
ती गतीमंद असल्याने तिने घडल्या प्रकाराची काहीच माहिती घरच्यांना सांगितली नाही. घडल्या प्रकाराची काहीच माहिती मुलीने घरी सांगितली नाही, अशी खात्री करून व याचा गैरफायदा घेऊन त्याने पुन्हा वेळोवेळी तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
दिल्ली-एनसीआरमध्ये पहाटेपासून वाऱ्यासह जोरदार पाऊस, अनेक ठिकाणी साचले पाणी..
मात्र ती मुलगी तब्बल सहा महिन्याची गरोदर आहे, हे घरातील पालकांच्या लक्षात येताच पालकांनी थेट भुईंज पोलिस ठाणे गाठले आणि पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी शुभम निकाम याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला.
तपास करत हे पथक मुंबईत जोगेश्वरी परिसरात पोहचले आणि पथकाने दिवसभर सापळा लावू