लाडकीच्या पैशावर पुरुषांचा ‘डल्ला’, तब्बल 21 कोटी लाटले; थेट कारवाईचे आदेश

पुणे : महायुती सरकार सत्तेत आणण्यात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा मोलाचा वाटा ठरला. या योजनेतील बोगसगिरी थांबवण्यासाठी सरकारने ई- केवायसी बंधनकारक केली आहे.आता या योजनेबद्दल अत्यंत मोठी माहिती पुढे आली. 14,298 पुरुषांनी लाडकी बहिणी होऊन या योजनेतून 21.44 कोटी लाटले, असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
राज्यातील 9 हजार 526 सरकारी लाडक्या बहिणींनी 14 कोटी 50 लाख रुपये घेतले. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबतची लेखी माहिती दिली. आता या योजनेचा पुरुषांनीही लाभ घेतल्याची माहिती समोर आली आहे.संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. तपासात अडथळा आणल्यास कारवाईपासून कोणीही सुटणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान राज्य सरकारकडून याप्रकरणी गंभीरतेने कार्यवाही सुरू झाली आहे. अनेक जणांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
विविध विभागांकडून रक्कम वसुलीचे आदेश दिल्याचा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दावा केला आहे.

निवडणुकीच्या तोंडावर अर्ज करणाऱ्या महिलेला या लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेता आला. मात्र, या योजनेसाठी काही नियम आणि अटी लागू करण्यात आल्या होत्या. त्यावेळी अर्जाची संख्या खूप जास्त असल्याने त्याची बारकाईने पाहणी करता आली नाही. आता सरकाकडून अर्जांची पडताळणी केली जात आहे.

