‘शिव ठाकरे’ ठरला उपविजेता तर रॅपर ‘एमसी स्टॅन’ बिग बॉस 16चा विजेता…!
मुंबई : रॅपर एमसी स्टॅनने रविवारी रात्री बिग बॉस 16 चे विजेतेपद पटकावले तर शिव ठाकरे उपविजेता ठरला. हा हंगाम 4 महिने चालला. बक्षीस म्हणून रॅपरला 31 लाख रुपये आणि एक आलिशान कार मिळाली. याआधी स्टॅन एमटीव्हीचा विजेता ठरला आहे.
प्रियंका चहर चौधरी, शिव ठाकरे आणि एमसी स्टॅन हे टॉप 3 फायनलमध्ये पोहोचले होते. प्रियंका शेवटी बाहेर पडली. एमसी स्टॅनला सर्वाधिक मते मिळाली. शोचा फिनाले जवळपास 5 तास चालला. प्रियांका बिग बॉस 16 चे विजेतेपद जिंकू शकली नसली तरी सलमानने सांगितले की, तीच त्याच्यासाठी खरी विजेती आहे.
शालीन आणि अर्चना अंतिम फेरीत बाहेर पडले
शालीन भनोत आणि अर्चना गौतम हे दोघे शोच्या टॉप 5 फायनलिस्टमध्ये होते. पण अंतिम फेरीत शालीन आणि अर्चना बाहेर पडले. अशा परिस्थितीत प्रियांकाची उपस्थिती असूनही एमसी स्टॅन आणि शिव हे ट्रॉफीसाठी प्रबळ स्पर्धक होते, अशी अटकळ बांधली जात होती.