एमबीबीएसला प्रवेश मिळवून देतो, ६० लाख रूपयांची फसवणूक, पुण्यातील हडपसरमधील धक्कादायक प्रकार..

पुणे : हडपसरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.वैद्यकीय प्रवेश देण्याचे आमिष दाखवून तब्बल ४० लाखांची फसवणूक केली आहे. एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश करुन देतो असे सांगून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी एका व्यावसायिकाने (वय ४९, रा. मगरपट्टा) हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सुनील कुमार (वय. ४५), सौरभ गुप्ता (वय. ४०), विकास गुप्ता (वय. २८), रणधीर सिंग (वय. ३०), प्रियांका मिश्रा (वय. २५) अशी संशयितांची नावे आहेत.
मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी यांच्या मुलीला एमबीबीएस अभ्यासक्रमास प्रवेश घ्यायचा होता. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात त्यांची एका व्यक्तीमार्फत आरोपींची ओळख झाली होती.आरोपींनी त्यांना मुलीला खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश देण्याचे आमिष दाखविले.
मुलीला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देतो म्हटल्यावर वडिलांनीही पैसे देण्यास होकार दिला. त्यांनी आपल्या मुलीसाठी पैसे दिले. परंतु आरोपींनी हे पैसे दिलेच नाही. त्यांची फसवणूक केली.
दरम्यान, वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश करुन देतो असे सांगून त्यांच्याकडून रोख आणि ऑनलाइन स्वरूपात ६० लाख रुपये घेतले.परंतु प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी आरोपींकडे पैशांची मागणी केली. त्यावर आरोपींनी २० लाख रुपये परत केले. मात्र, उर्वरित ४० लाख रुपये न देता फसवणूक केली आहे.