Mauli Katke : शिरुर-हवेलीत माऊली कटकेंच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद; हवेली तालुक्यात प्रचारात तालुक्याची अस्मिता होतेय जागृत…
Mauli Katke पुणे : हवेली तालुक्याच्या जघणघडणीचे प्रणते दिवंगत माजी खासदार आण्णासाहेब मगर यांच्या पश्चात अनेक दशकांनी पूर्व हवेली तालुक्यातील राजकारणाची निर्माण झालेली पोकळी यंदाच्या विधानसभा निधडणूकीत भरुन निघणार काय? अशी परिस्थिती शिरुर- हवेली विधानसभेच्या निवडणुकीत नागरीकांना दिसू लागली आहे. शिरुर-हवेलीच्या राजकारणात शेवटची संधी म्हणून निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या माऊली कटकेंना हवेली तालुक्यासह शिरुर तालुक्यात प्रचंड उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला असून माऊली कटकेंनी आपला उमेदवारी अर्ज (ता.२७) ऑक्टोबर रोजी दाखल केल्यानंतर थेऊर येथून श्री चिंतामणी चरणी सुरू झालेला प्रचाराचा झंझावात दोन्ही तालुक्यातील नागरीकांनी गावभेट दौऱ्यात उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन अधोरेखित केले आहे.
महायुतीचे उमेदवार माऊली कटके यांनी श्री चिंतामणी चरणी नारळ वाढवून सुरू केलेला प्रचाराचा झंझावात शिरुर तालुक्यातील तळेगाव-ढमढेरे, उरळगाव, शिक्रापूर, विठ्ठलवाडी, टाळकी हाजी या नागरीकांनी डोळ्यांनी पाहिला. तर बुधवारी म्हणून (ता.७) रोजी हवेली तालुक्यातील सोलापूर रस्त्यावरील गावांत नागरीकांनी गावोगावी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन उरली सुरली औपचारिकता पूर्ण केल्याने माऊली कटकेंचा विजयाचा वारु चारही बाजूंनी उधळू लागल्याची साक्ष नागरीकांनी देऊन टाकली आहे. Mauli Katke
बुधवारी महायुतीचे उमेदवार माऊली कटके यांनी हवेली तालुक्यातील आळंदी म्हातोबा , कुंजीरवाडी, सोरतापवाडी, पेठ, नायगाव, कोरेगावमूळ, लोणीकाळभोर, कदमवाकवस्ती येथे गावभेट दौरा काढून शिरुर-हवेलीच्या परिवर्तनाच्या क्रांतीत सहभागी व्हावे अशी साद मतदारांना घातली आहे. माऊली कटके यांनी आपल्या प्रचारात हवेली तालुक्यातील पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुक कोंडी, शेती सिंचनाचे घटत चाललेले आवर्तन, शेतकऱ्यांच्या वीजेचा न सुटलेला प्रश्न , डीपींचा प्रश्न, नर्सरी व्यावसायिकांची नुकसान भरपाई, शेतकऱ्यांची अवकाळी पावसाने झालेली नुकसान भरपाई, गोरगरिबांचा आरोग्यासाठी शासन मदत करण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी विद्यमान आमदारांनी पाच वर्षात काही गेलेच नसल्याचे सांगून स्वतः ला कार्यसम्राट म्हणविणाऱ्यांना घरी बसविण्याचे टिकास्त्र सोडले आहे.
दरम्यान, माऊली कटके यांच्या गावभेट दौऱ्यात कटके यांनी काढलेल्या ज्योतिर्लिंग उज्जैन येथील महाकालदर्शन वारीचा मोठा प्रभाव नागरीकांवर जाणवला असून महिला, अबाल वृद्ध, तरुणांनी अनेक गावांत ‘जय महाकाय,जय श्रीरामाचा’ नारा देऊन उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
माऊली कटके यांच्या गावभेट दौऱ्यात जिल्हा बॅकेचे संचालक प्रदिप कंद, ‘यशवंत’चे अध्यक्ष सुभाष जगताप, पुणे बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर, महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर, कदमवाकवस्तीचे सरपंच चित्तरंजन गायकवाड, कुंजीरवाडीचे माजी सरपंच सचिन तुपे, कमलेश काळभोर, नवनाथ काकडे आदी प्रमुख नेते गावभेट दौऱ्यात सहभागी होऊन भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी चे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचे दिसत होते.
दरम्यान, शिरुर-हवेलीत मिळणारा प्रतिसाद बघता गावोगावी हवेली तालुक्याची अस्मिता जागृत झाली असून पूर्व हवेली तालुक्याचे अनेक दशकांचे अधुरे स्वप्न यंदा पूर्ण होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.