Mauli Katke : माऊली कटकेंच्या सोलापूर रस्त्यावरील गावभेट दौऱ्यात उत्स्फुर्त स्वागत! तरडे ग्रामस्थांनी फेटा, घोंगडी घालून पाठबळासाठी दिले अभिवचन..!!

Mauli Katke उरुळीकांचन : घोड्यावर टाक.. माऊली .. माऊलीची धूण.. रस्तावर स्वागतासाठी आतुरलेले तरुण ,अबाल वृद्ध तसेच महिलांनी ओवाळणी उतरवित .. मस्तकी फेट्याचा साज चढवित ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटकेंचा प्रचाराचा दुसरा फेरा तरडेतून उत्स्फूर्तपणे स्वागताने सुरू झाला. या स्वागताने भारावलेल्या माऊली कटकेंनी प्रत्येक ग्रामस्थाचे आर्शिवाद सार्थ ठरवित शिरुर-हवेलीच्या भवितव्यासाठी झटणार असल्याचा मनोदय आपल्या शब्दांत व्यक्त केला.

शिरुर-हवेली मतदारसंघातील राष्ट्रवादी -महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटकेंचा दुसरा गावभेट प्रचार दौरा तरडे (ता. हवेली ) येथे उत्स्फुर्त स्वागताने सुरू झाला. या दौऱ्याच्या प्रारंभी गावातच ग्रामस्थांनी घोड्यावरून मिरवणूक काढीत आपला मानपान थाटात करुन दाखविला. यावेळी ग्रामस्थ दुतर्फा गर्दी करुन आपल्या लाडक्या उमेदवाराला स्वागतासाठी आतुरतेने वाट पाहत असल्याचे भावनिक चित्र तरडे ग्रामस्थांनी दाखविले. ग्रामस्थांनी औक्षण, धार्मिक फेटा व थोरामोठ्यांच्या आर्शिवादाने या गावभेटीला माऊली कटकेंचा पाठिमागे बळ दिल्याची सामुहिक साक्षच दिली असल्याचे चित्र गावभेट दौऱ्यात दिसले. Mauli Katke
यावेळी ग्रामस्थांच्या सत्काराला उत्तर देताना माऊली कटके म्हणाले,आपला उद्याचा आदर्श मतदारसंघ घडविण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. मागील कित्येक वर्षे या मतदारसंघात कामे झाली आहे अशा फुशारक्या सुरू आहे. स्वतः वर विविध विशेषने जोडीत मतदारसंघाचा विकास केला म्हणायचा परंतु तसे चित्र पाच वर्षात झाले का? असा प्रश्न शिरुर-हवेलीत फिरताना दिसत आहे. आम्ही महिलांना तिर्थ दर्शनाला नेले म्हणून म्हणून टिका होते. परंतू पुढील काळात विविध तिर्थक्षेत्रांचा नागरीकांना लाभ होणारच असे त्यांनी सांगितले.

या गावभेट दौऱ्यासाठी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, हवेली बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर , लक्ष्मण केसकर, रोहिदास उंद्रे, सुदर्शन चौधरी, राष्ट्रवादी प्रदेश सचिव गुलाब चौधरी, सरपंच अविनाश दाभाडे,उपसरपंच संचिता गाढवे, वसंतराव जगताप, भाऊसाहेब गडदे, युवराज काळे, मारुती बरकडे, काळुराम कुरकुंडे, अजय गाढवे आदी मान्यवर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.