सोरतापवाडीत मातोश्री स्कूलचा स्नेहमेळावा धुमधडाक्यात साजरा ! स्नेहसंमेलनाने ग्रामस्थांची मने जिंकली….!

उरुळी कांचन : मातोश्री इंग्लिश मीडियम स्कूल सोरतापवाडी (ता.हवेली ) येथील शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम,नृत्य आणि नाटकाद्वारे आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करीत उपस्थितांची मने जिंकली.

मातोश्री इंग्लिश मेडीयम स्कूलमध्ये दरवर्षी प्रमाणे यंदाचाही वार्षिक स्नेहमेळावा अत्यंत उत्साहात पार पडला. आकर्षक हिंदी , मराठी गाण्यांवर नृत्य कला सादर करणारी कोवळी पाऊले अतिशय गुणवत्तापूर्वक नृत्य अविष्कार सादर करीत होती.उपस्थितांनी दिलखुलास साद देत या कलाकरांना प्रोत्साहित केले.
या वार्षिक स्नेहसंमेलनाला पश्चिम महाराष्ट्र राज्य शिक्षण सेना अध्यक्ष सुनिल जगताप ,नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र बडेकर,नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य सुदर्शन चौधरी, मा.उपसरपंच शंकर कड, सुरज चौधरी,अमित चौधरी, जयदिप जाधव, मोनिका घोंगडे, शैलेश चंद,राहुल चौधरी, तन्वी आडेगावकर , शाळेचे अध्यक्ष अविनाश मेमाणे उपस्थित होते.
