Matheran : माथेरानला जाणाऱ्या पर्यटकांसाठी आनंदाची बातमी, रेल्वे प्रशासनाने घेतला सर्वांना हवा असणारा निर्णय, जाणून घ्या…


Matheran : माथेरानला जाण्याचं प्लान करताय?, मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. पर्यटकांना राहण्यासाठी सर्वोत्तम सुविधा प्रदान करण्याच्या उद्देशाने मध्य रेल्वे प्रशासनाकडून पॉड हॉटेल सुरू करण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर पहिले पॉड हॉटेल सुरू करण्यात आले.

दरवर्षी लाखोंच्या संख्येने माथेरान येथे पर्यटक येत असतात. माथेरानमधील प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी एक ते दोन दिवसांपेक्षा अधिक कालावधी लागतो. मात्र राहण्याची चांगली सोय नसल्याने पर्यटक वनडे प्लान करतात. माथेरानमध्ये पर्यटकांना राहण्यासाठी छोटी-मोठी हॉटेल उपलब्ध आहेत. Matheran

मात्र पर्यटकांना राहण्यासाठी सर्वोत्तम सुविधा प्रदान करण्याच्या उद्देशाने मध्य रेल्वे प्रशासनाकडून पॉड हॉटेल सुरू करण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर पहिले पॉड हॉटेल सुरू करण्यात आले. पुढे मध्य रेल्वेच्या सीएसएमटी स्थानकात पॉड हॉटेलची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

या पॉड हॉटेलमध्ये पर्यटक आणि प्रवाशांना उत्तम सुविधा प्रदान करण्यात येते. पॉड हॉटेलला मिळणाऱ्या पसंतीमुळे मध्य रेल्वेने पर्यटकांच्या सुविधेसाठी माथेरानमध्ये पॉड हॉटेल सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरामदायी आणि किफायतशीर निवासाचा पर्याय म्हणून पॉड हॉटेल येत्या ऑगस्ट महिन्यात पर्यटकांसाठी खुले होणार आहे. यामुळे पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!