मस्तानी तलावाचा लवकरच सातबारा, अनेक अडचणी होणार दूर


 

पुणे : वडकी येथील ऐतिहासिक मस्तानी तलावाचे मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे. यामुळे याठिकाणी पर्यटक येत असतात. आता मस्तानी तलावाच्या संवर्धनासाठी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे याठिकाणी विकास करण्यात येणार आहे.

याबाबत तलावाच्या मालकीची कोणत्याही शासकीय विभागाकडे नोंद नव्हती. असे असताना आता विकासाला तांत्रिक अडचणी येत होत्या. मात्र, तलावाचा सातबारा भूमिअभिलेख विभागाकडून लवकरच मिळणार आहे.

यामुळे परिसराचा सर्वांगीण विकास करता येईल,’ असे आमदार संजय जगताप यांनी सांगितले. वडकी गावात विविध विकासकामांचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते.

खासदार सुप्रिया सुळे व जगताप यांच्या प्रयत्नातून या विकासकामांसाठी निधी उपलब्ध झाला आहे. वडकीतील अन्य कामांसाठीही निधी उपलब्ध होणार असल्याचे या प्रसंगी जगताप यांनी सांगितले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!