पुण्यातील वाघोली परिसरातील भंगार दुकानाला भीषण आग ; परिसरात धुराचे लोट

पुणे : पुण्यातील वाघोली परिसरात एका भंगाराच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत भंगाराचे संपूर्ण दुकान जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, वाघोली परिसरातील भंगाराच्या दुकानाला लागलेल्या आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते.गेल्या काही दिवसापासून भंगार दुकानांचा विषय ऐरणीवर आला असून यावरती कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. या आगीतील प्लॅस्टिक व इतर मटरेलमुळे प्रचंड असे धुराचे लोट आकाशात पसरले. या घटनेची माहिती मिळताच वाघोली पोलीस, पुणे महानगरपालिका व पीएमआरडीए अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर लगेचच आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. आग कशी लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. आग लागण्याचे कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
Views:
[jp_post_view]