रत्नागिरीतील केमिकल कंपनीत भीषण स्फोट; 10 कामगार भाजले तर 3 जण गंभीर..


पुणे : रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठी रासायनिक एमआयडीसी असलेल्या लोटे एमआयडीसीमध्ये एका केमिकल कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये 10 कामगार भाजले आहेत तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार,लोटे एमआयडीसीमध्ये असलेल्या डॉक्टर खान केमिकल कंपनीमध्ये स्फोट झाला. हा स्फोट रिएक्टरमध्ये झाला असूनज्यावेळी स्फोट झाला त्यावेळी दुपाराच्या पाळीमध्ये काही कर्मचारी कंपनीत होते. या स्फोटामध्ये 10 कामगार भाजले आहे.त्यापैकी तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे.

या घटनेची माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दल आणि रग्णवाहिकांना देण्यात आली आहे. कंपनीतील दहा कामगार गंभीरित्या भाजले आहेत., सर्व जखमींना तातडीने नजीकच्याच परशुराम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. ही घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!