लोणी काळभोरमध्ये विवाहितेवर बलात्कार, फोटो पतीला दाखवण्याची दिली धमकी..


पुणे : पतीला फोटो दाखविण्याची तसेच मुलांना जीवे मारण्याची धमकी देवुन नराधमाने विवाहितेवर बलात्कार केल्याची घटना लोणी काळभोरमध्ये घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

 

याप्रकरणी नराधमाविरूध्द लोणी काळभोर पोलिस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन विलास कदम रा. एस.के. ग्रुप, अंबामाता चौक सुखसागरनगर, पुणे असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.

 

यासंदर्भात कोंढवा परिसरात राहणार्‍या 30 वर्षीय विवाहीतेने लोणी काळभोर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. आरोपी सचिन विलास कदम हा पिडीत विवाहीतेच्या ओळखीचा आहे. त्याने विवाहितेस जॉब शोधुन देईल लग्न करेन असे आमिष दाखविले.

 

आरोपी सचिन कदमने विवाहितेचे व त्याचे फोटो विवाहितेच्या पतीला दाखवुन पतीला व मुलांना जीवे मारीन अशी धमकी दिली. आरोपी नराधमाने वारंवार विवाहितेच्या इच्छेविरूध्द जबरदस्तीने अनैसर्गिक पध्दतीने शारीरिक संबंध ठेवुन त्यांना मारहाण केली.

 

आरोपी नराधम हा वेळावेळी पती व मुलांना जीवे मारण्याची धमकी देत होता तसेच फोटो दाखवितो असे म्हणत होता म्हणुन विवाहितेने इतके दिवस पोलिसांकडे तक्रार केली नाही. मात्र, आरोपी हा विवाहीतेला वेळावेळी वारंवार त्रास देत असल्याने अखेर विवाहीतेने लोणी काळभोर पोलिसांकडे तक्रार दिली.

 

पोलिसांनी त्याच्याविरूध्द बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दाभाडे करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!