कदमवाकवस्ती येथे विवाहित महिलेचा विनयभंग; कंपनीच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल…

लोणी काळभोर : धमकी देऊन अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ करत विवाहित महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एका कंपनीच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी २९ वर्षे वयाच्या विवाहित पिडीतेने दिलेल्या फिर्यादीवरून एका कंपनीचे व्यवस्थापक परमेश्वर साहेबराव शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडीता या आपल्या आई, वडिल, पती, दोन मुलांसह रहातात. पती मिळेल त्या ठिकाणी ड्रायव्हर म्हणुन नोकरी करीत असुन सध्या त्या एका किराणा दुकानामध्ये बिलिंग करण्याचे नोकरीस करतात. पती – पत्नीचे उत्पन्नातुन ते कुटुंबाची उपजिवीका करतात.
पिडीता हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हददीतील घोरपडे वस्ती येथील एका कंपनीमध्ये मे २०२५ मध्ये ऑफिस ऍम्पलॉय म्हणुन नोकरीस होत्या. त्यावेळेस त्यांची ओळख कंपनीचे व्यवस्थापक परमेश्वर शिंदे यांचेसोबत झाली होती. व्यवस्थापक परमेश्वर यांची पत्नी देखील त्यांचेसोबत तेथे नोकरी करीत होत्या.

दिनांक १६ जुलै २०२५ रोजी ३ वाजण्याच्या सुमारांस त्या घरी असताना शिंदे यांनी त्याच्या मोबाईल व्हाटस ॲपवरुन आय लव्ह यू असा इंग्रजी भाषेमध्ये मॅसेज केला त्यावेळेस सदरचा मॅसेज हा त्यांनी चुकीने पाठविला असेल असा विचार करुन सदर मॅसेजला पिडीतेने प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर १७ जुलै रोजी त्या कामावर गेल्या. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारांस काम करीत असताना ऑफिसमध्ये कोणीही नसताना परमेश्वर हे जवळ आले व त्यांनी पिडीतेचा हात त्याचे हातामध्ये घेवुन “मी तुला काल मेसेज केला होता तु पाहुन देखील मला रिप्लाय दिला नाही, खरेच तु मला खुप आवडतेस” असे म्हणुन महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न करुन विनयभंग केला.

त्यावेळी तिने त्यांना तुम्ही करीत आहे ते खुप चुकीचे आहे असे सांगण्याचा प्रयत्न केला असता ते काहीएक ऐकण्याचे परिस्थीतीमध्ये नव्हते त्यामुळे पिडीता ऑफिसमधुन घरी निघुन आली. व्यवस्थापकांच्या वागणुकीमध्ये काहीतरी बदल होईल असा विचार करुन दोन ते तिन दिवस सुट्टी घेवुन पुन्हा ऑफिसवर जावुन काम सुरु केले परंतु परमेश्वर हे पिडीता ऑफिसमध्ये एकटी असताना वारंवार पाठीमागे येवुन तिचेशी बोलण्याचा प्रयत्न करुन तिला मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली.
त्यामुळे तिने ऑक्टोबर २०२५ मध्ये सदर नोकरी सोडुन एका किराणा दुकानामध्ये बिलिंग करण्याचे नोकरी करण्यास सुरुवात केली. प्रतिष्ठेला घाबरुन आज पावेतो त्याचेविरुध्द कोणालाही तक्रार केली नाही. त्यानंतर शनिवार (३ जानेवारी २०२६) रोजी सकाळी १२.३० वाजण्याच्या सुमारांस त्या घरी असताना परमेश्वर शिंदे याने त्याच्या मोबाईल वरून कॉल करुन त्याने तिला अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ करुन “धंदेवाली तु लफडे लावती व माझ्या बायकोला काय सांगितले.
तु घरे जाळायचे कमीशन घेते” अशा आश्लिल भाषेमध्ये शिवीगाळ करुन धमकी दिली त्यामुळे ती घाबरुन गेली. व सायंकाळी पतीला सदर घटनेबाबत सांगितले. पती गावाला असल्यामुळे तिने आपल्या वडीलांसोबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली आहे. यांवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अंकुश बोराटे हे करत आहेत.
