मनोज जरांगे यांचे आवाहन अन् धाराशिवमध्ये १० हजार गाड्यांचे बुकिंग! मराठा आरक्षणासाठी मराठ्यांचा मुंबईत एल्गार..


मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी राज्यात मनोज जरांगे पाटील यांनी मोठा लढा उभा केला आहे. आता मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 29 ऑगस्टला मुंबईच्या आझाद मैदानात होणाऱ्या आंदोलनाची धाराशिवमध्ये जोरदार तयारी सुरू आहे. याठिकाणी आता समाजाचे लोकं एकत्र येत नियोजन करत आहेत.

प्रत्येक गावामध्ये चावडी बैठका घेत 29 ऑगस्टच्या आंदोलनाबद्दल मराठा बांधव जनजागृती करत आहेत. आतापर्यंत मुंबईच्या आंदोलनासाठी दहा हजार गाड्यांचं बुकिंग झाल आहे. यामुळे या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर लोकं मुंबईच्या दिशेने येणार आहेत. यामुळे सरकारला यावर तोडगा काढावा लागणार आहे. चलो मुंबई अशा आशयाचे बॅनर आणि पोम्प्लेट छापण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मनोज जरांगे यांच्या गाठीभेटी दौऱ्यानंतर मराठा कार्यकर्त्याकडून चावडी बैठकांमधून समाजजागृती करण्यात येत आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या लढ्याचा 29 ऑगस्टला मुंबईत पुन्हा एकदा मराठयांचा एल्गार पाहायला मिळणार असल्याचा दावा मराठा आंदोलकांनी केला आहे. यामुळे सरकारला देखील याची दखल घ्यावी लागणार आहे.

याबाबत नुकतीच धाराशिव शहरात बैठक पार पडली. या बैठकीत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी राजकीय नेत्यांना इशारा दिला आहे. यावेळी जरांगे पाटील म्हणाले, जो नेता 29 ऑगस्टला मुंबईच्या आंदोलनात सहभागी होणार नाही, त्याला आगामी नगरपालिका, पंचायत समिती, महानगरपालिका निवडणुकांमध्ये पाडा.

मनोज जरांगे यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तर 29 ऑगस्टच्या मुंबई येथील आंदोलनामध्ये मराठा बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे. यामुळे आता कोण कोण सहभागी होणार, हे लवकरच समजेल. याबाबत राज्यात तयारी मात्र जोरदार सुरु असून आता आरक्षणच घेऊन यायचं असा निर्धार करण्यात आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!