Maratha Reservation : ब्रेकिंग! मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडली, मराठा समाज आक्रमक..

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. प्रसार माध्यमाशी बोलताना त्यांचा हात थरथरत होता. माईकही हातातून खाली पडला. मात्र क्षीण झालेल्या आवाजातही त्यांनी मराठा आरक्षणाबाबत आपली ठाम भूमिका मांडली.
त्याचबरोबर सध्या अनेक तरुणांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आत्महत्या देखील केल्या आहेत. या तरुणांना देखील मनोज जरांगे पाटील यांनी एक आव्हान केले आहे. Maratha Reservation
मराठा समाजातील तरुणांनी आपल्या गावात आमरण उपोषण सुरू केलं असेल तर पोलीस ठाण्यात माहिती अर्ज द्या आत्महत्या करू नका असं आवाहन करत आपल्यातील एकजुटीत फूट पडू देऊ नका.
त्याचबरोबर यावेळी त्यांनी सरकारला एक गंभीर इशारा देखील दिला आहे. अजून तीन दिवस आम्ही सरकारची वाट पाहणार आहोत. जर सरकारला माणुसकी समजत नसेल तर आमची ताकद त्यांना दाखवू असा गंभीर इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. त्यामुळे येत्या काळात मनोज जरांगे नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आरक्षण देऊ असे का म्हणत नाहीत, फक्त सावंत का म्हणतात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानात कोणी बोळे घातलेत का. फडणवीस यांनी फक्त एकदा चर्चेला यावं, त्यांना कोणी अडवणार नाही, असंही ते म्हणाले आहेत.