मराठा आरक्षणाचा आणखी एक बळी , गळफास घेऊन जीवन संपविले
परभणी : मनोज जरांगे पाटील मराठा समाज ओबीसीतून आरक्षण मिळावे यावर ठाम आहेत. अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे .मराठा समाजाच्या आरक्षणासाठी देऊळगाव येथील एका शेतमजूर तरूणाने त्याच्या शर्टने पळसाच्या झाडाला गळफास घेवून जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे.
मराठा समाजाला राज्य सरकारने आरक्षण दिले आहे . पण समाजाला ओबीसी मधून आरक्षण हवं आहे . या मागणीसाठी त्याने निराश होऊन हा टोकाचा पाऊल उचलले आहे .
या घटनेमुळे परभणी जिल्ह्यामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. जानेवारी महिन्यामध्ये परभणी जिल्ह्यात मराठा आरक्षण मिळावं, यासाठी एका तरुणाने आत्महत्या केली होती. आताही याच जिल्ह्यातून आणखी एका तरुणाने टोकाचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे यापूर्वीही अनेक तरुणांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे
Views:
[jp_post_view]