Maratha Reservation : मराठा समाजाबाबत आज मोठा निर्णय होणार? काही तासातच विशेष अधिवेशनाला सुरवात होणार, संपूर्ण राज्याचं लागले लक्ष..

Maratha Reservation : महाराष्ट्रासाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. कारण, मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी राज्य सरकारने मंगळवारी (ता.२०) एकदिवसीय विशेष अधिवेशन बोलावलं आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयक मांडलं जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: मराठा आरक्षण विधेयकाचा मसूदा वाचणार आहेत.
मराठा समाजाच्या आरक्षांबाबतच्या सर्व मागण्या सरकारने मान्य कराव्या यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. सरकारने मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावणार असल्याची घोषणा केली होती. दरम्यान आता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने मंगळवारी विशेष अधिवेशन बोलावलं आहे.
पुढील काही तासांत हे अधिवेशन सुरु होणार असून हे विशेष अधिवेशन महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक असेल. कारण, मराठा समाजाला किती टक्के आरक्षण मिळणार, याबाबतचा या अधिवेशनात निर्णय होणार आहे. त्यामुळे या अधिवेशनाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. Maratha Reservation
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावलं असून यामध्ये टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीतलं मराठा आरक्षण देण्यासंदर्भात आणि कुठल्याही समाजावर अन्याय न होता मराठा समाजाला आरक्षण मिळेल. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हंटले आहे. त्यामुळे आज नेमकं काय होतं? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.