Maratha Reservation : मराठा आंदोलन पेटले! आंदोलकांनी भाजप खासदाराच्या ताफ्यातील दोन गाड्या फोडल्या…
Maratha Reservation : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये राजकीय नेते आणि पुढाऱ्यांना मराठा संघटनांकडून गावबंदी करण्यात येत आहे. जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत गावात पाय ठेवू देणार नाही, अशी भूमिका मराठा समाजाने घेतली आहे.
आता याचे पडसाद राजकीय वर्तुळात देखील उमटत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या नांदेडचे भाजपा खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागला आहे. Maratha Reservation
प्रताप पाटील चिखलीकर हे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मनोहर तेलंग यांच्या भेटीसाठी गुरुवारी रात्री कंधार तालुक्यातील अंबुलगा या गावात आले होते. यावेळी चिखलीकर गावात आल्याचे दिसताच त्या ठिकाणचे गावकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
खासदार चिखलीकर गावात आल्याचे लक्षात येताच गावकरी आक्रमक झाले. आरक्षण दिल्याशिवाय आमच्या गावात पाय ठेवू नका, असे म्हणत संतप्त आंदोलकांनी चिखलीकर यांना घेरले. यावेळी एक मराठा, लाख मराठा. मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे अशी घोषणाबाजी मराठा आंदोलकांनी केली आहे.
दरम्यान, संतप्त आंदोलकांनी चिखलीकर यांच्या ताफ्यातील दोन गाड्या देखील फोडल्या. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, मराठा समाजाच आक्रमक झाल्याचे लक्षात येताच चिखलीकर यांनी तातडीने अंबुलगा गावातून काढता पाय