Maratha Reservation : मराठा आरक्षण प्रकरणी घडामोडींना वेग, आता ६ डिसेंबरला सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी..
Maratha Reservation : राज्यात सध्या मराठा आरक्षण हा मुद्दा पेटला आहे. मराठा समाजाकडून आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलने सभा, रास्ता रोको करण्यात आले. याच पारश्वभूमीवर एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
मराठा आरक्षणासंदर्भात उद्या बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी दाखल केलेल्या क्युरेटीव्ह याचिकेवर (ता.६) रोजी पहिली सुनावणी पार पडणार आहे. Maratha Reservation
मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने दाखल केलेल्या क्युरेटीव्ह याचिकेवर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. दुपारी दीड वाजता ही याचिका सुनावणीस येणार आहे. या सुनावणीमध्ये जयश्री पाटील विरोधक आहेत. Maratha Reservation या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय रद्द केला. यामुळे राज्य सरकारने मराठा समाजास दिलेले आरक्षण टिकले नाही. त्यानंतर राज्य सरकारने १३ ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात क्युरेटीव्ह पिटीशन दाखल केली होती.
राज्य सरकारने दाखल केलेल्या याचिकेनंतर ही पहिलीच सुनावणी सहा डिसेंबर रोजी होत आहे. यामुळे मराठा समाजाचे नव्हे तर संपूर्ण राज्याचे लक्ष सर्वोच्च न्यायालयाकडे लागले आहे.