Maratha Reservation : मोठी बातमी! मराठा आरक्षणाची तीव्रता वाढली, आता थेट मंत्रालयालाच ठोकले टाळे…
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय आमदार मंत्रालयासमोर आंदोलन करत आहेत. यावेळी आमदारांकडून मंत्रालयाला टाळे लावण्यात आले आहे. कोणत्याही मंत्र्याला आम्ही मंत्रालयात जाऊ देणार नाही. मराठा आरक्षणासाठी अधिवेशन बोलवा, अशी मागणी आमदार करत आहेत.
मंत्रालयाच्या परिसरात सध्या सर्वपक्षीय आमदार आंदोलन करत आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी त्यांनी हे आंदोलन केले आहे. यावेळी आमदारांनी मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराज की जय, विशेष अधिवेशन बोलावलेच पाहिजे अशा घोषणा यावेळी या आमदारांनी दिल्या आहेत. Maratha Reservation
राजू नवघरे, अमोल मिटकरी, राहुल पाटील, कैलास पाटील, विक्रम काळे, चेतन तुपे, बाबासाहेब आजबे, यशवंत माने, निलेश लंके , बाळासाहेब पाटील, दिलीप बनकर, बाबाजानी दुर्रानी, मोहन उबर्डे हे आमदार मंत्रालयाच्या समोर आंदोलन करत आहेत. तसेच मराठा आरक्षणासंदर्भात तातडीने विशेष आधिवेशन बोलवावे अशी मागणी या आमदारांची केली आहे.
यावेळी आंदोलन करणा-या आमदारांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, महिला आरक्षणाकरिता संसदेचे विशेष अधिवेशन बोलवले त्यावर तोडगा निघाला, त्याप्रमाणे महाराष्ट्र विधानसभेने एक दिवसाचे अतितात्काळ अधिवेशन बोलवावे, मराठा आंदोलनाच्या संदर्भात ज्या मराठा समाजाच्या भावना आहेत, मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्यात यासाठी आम्ही मंत्रालयाला टाळे ठोकले आहे.