Maratha Reservation : मराठ्यांना सरसकट आरक्षण देणं शक्य नाही, भाजपच्या बड्या मंत्र्यांचे मोठे वक्तव्य..

Maratha Reservation : मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मराठा नेते मनोज जरांगे यांनी दोन वेळा उपोषण केले आहे. मराठ्यांना आरक्षण देण्यासंदर्भात २४ डिसेंबर अशी डेडलाईन सरकारने दिल्यानंतर अलिकडेच मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे.

अशातच आता भाजपच्या बड्या वक्तव्याने मराठा आरक्षणाबाबत वक्तव्य केल्याने खळबळ उडाली आहे. मविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मराठा समाजाला सरसकट आरक्षण देणं जमणार नाही अशी भूमिका मांडली आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून राज्याचे राजकारण पुन्हा एकदा तापू शकते. Maratha Reservation
गिरीश महाजन यांच्या तोंडून भाजपची भूमिका मांडली जात आहे का ? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. समाजातील अभ्यासक, प्राध्यापक, कुलगुरु विचारवत यांनी सर्वांनी विचार करून सरसकट आरक्षण देता येणार नाही असे ठरवले आहे. कोर्टाने आधी आरक्षण नाकारले आहे. त्यावर फेरयाचिका केली असून समाजाला नक्की न्याय मिळेल असे गिरीश महाजन म्हणाले आहे.

मराठ्यांना सरसकट आरक्षण देता येणार नाही. हे मनोज जरांगे यांच्या जवळच्या लोकांना देखील माहीती आहे. समाजातील अभ्यासक, प्राध्यापक, कुलगुरु विचारवत यांनी सर्वांनी विचार करून ठरविले आहे की सरसकट आरक्षण देता येणार नाही.
एससीबीसी कोर्टातून मिळेल. त्यातूनच न्याय मिळेल, कोर्टाने आधी मराठ्यांना आरक्षण नाकारले आहे. त्यावर फेरयाचिका केली आहे. त्यातून समाजाला नक्की न्याय मिळेल असेही गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.