Maratha Reservation : मोठी बातमी! मराठा आंदोलकांनी मंत्री हसन मुश्रीफ यांची गाडी फोडली, आमदार निवासाबाहेर आंदोलकांचा हल्लाबोल..
Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात चांगलाच पेटला आहे. मनोज जरांगे यांचं अंतरवली सराटी येथे उपोषण सुरू असून त्याला पाठिंबा देण्यासाठी राज्यभर आंदोलने केली जात आहेत. मराठा आरक्षणासाठी राज्यात सुरु असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याच्या घटना समोर येत आहेत.
यादरम्यान आज मुंबईत मंत्री हसन मुश्रीफ यांची गाडी फोडल्याचा प्रकार समोर आला आहे. मराठा आंदोलकांनी ही तोडफोड केल्याची माहिती मिळत आहे. तीन तरुणांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली आहे. Maratha Reservation
मराठा आंदोलकांकडून मुद्दाम हसन मुश्रीफ यांची गाडी हेरून मराठा त्याची तोडफोड करण्यात आली आहे. यावेळी परिसरात उपस्थित पोलिसांनी लगेच हा हल्ला करणाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. पोलीसांनी हल्ला करणाऱ्यांसोबत व्हिडीओ काढणाऱ्या त्यांच्या साथीदारास देखील ताब्यात घेतले आहे.
गाडीवर हल्ला झाला त्या ठिकाणी आधीपासूनच मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. या प्रकरानंतर येथे अजून पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. दरम्यान मंत्रालयाच्या अगदी बाजूलाच हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.