Maratha Reservation : मोठी बातमी! मनोज जरांगे यांची ९०० एकरावरील नियोजित सभा रद्द, नेमकं घडलं काय? जाणून घ्या..
Maratha Reservation : मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची आठ जून रोजी नारायणगड येथे तब्बल ९०० एकर परिसरात भव्य सभा होणार होतील. या सभेला राज्यातून कोट्यावधी मराठा बांधव उपस्थित राहणार होते, मात्र आता ही सभा रद्द करण्यात आली आहे.
अर्थात ही सभा रद्द करण्याचे कारण दुसरे तिसरे किंवा राजकीय नसून सध्या संपूर्ण राज्यात दुष्काळाचे सावट आहे. त्यातही मराठवाड्यातील पाण्याची दुर्भिक्षता लक्षात घेत सभेला येणाऱ्या लोकांची असुविधा होऊ नये म्हणून ही सभा रद्द करण्यात आली आहे.
बीड जिल्ह्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ही सभा रद्द करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार आता ही सभा जून नंतर होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात बैठक होणार आहे, त्यामध्ये पुढील निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. Maratha Reservation
नारायणगड येथील नियोजित सभा ही राज्यातील सर्वात मोठी आणि ऐतिहासिक सभा होणार असल्याचे सांगितले जात होते. त्या पार्श्वभूमीवर या सभेची राज्यभर चर्चा होती. या सभेसाठी राज्यातूनच नव्हे, तर परराज्यातूनही मराठा बांधव येणार असल्याची माहिती दिली जात होती.