Maratha Reservation : सरकारला दिलेली मुदत अखेर संपली! मनोज जरांगेच्या लढ्याला पुन्हा सुरुवात, मराठ्यांना केलं ‘हे’ आवाहन..


Maratha Reservation : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला मराठा आरक्षणासाठी ४० दिवसांचा अवधी दिला होता. या अल्टिमेटमचा कालचा शेवटचा दिवस होता. दिवसभर सरकारकडून मनोज जरांगे पाटलांना कोणतंही निवेदन देण्यात आलं नाही. आजपासून आमरण उपोषणाला पुन्हा मनोज जरांगे पाटील यांनी सुरुवात केली आहे. Maratha Reservation

सरकारला दिलेला वेळ संपल्याने जरांगे यांनी उपोषणाची भूमिका ठाम ठेवली आहे. आजपासून मी उपोषणाला बसतोय. सरकार आमच्या वेदना समजेल अशी आशा होती, पण सरकार दिशाभूल करतंय. सरकारला दिलेला ४० दिवसांचा अल्टिमेट संपला, ४१ दिवस उजाडला तरी, सरकार आरक्षणासाठी कोणतीही भूमिका घेत नाही, असे जरांगे यांनी म्हंटले आहे.

अन्न-पाणी घेणार नाही, औषधे घेणार नाही. गावात कुणी आलं तर त्यांना शांततेत माघारी पाठवा, असे आवाहन जरांगे यांनी गावकऱ्यांना केलं आहे. उग्र आंदोलन करू नका, आंदोलन शांततेनं करा, आत्महत्या करू नका, असेही जरांगे यांनी म्हंटले आहे. Maratha Reservation

सरकार आमच्या वेदना समजेल अशी आशा होती, पण सरकार दिशाभूल करत आहेत. सरकारला दिलेला ४० दिवसांचा अल्टिमेटम संपला, ४१ दिवस उजाडला तरी, सरकार आरक्षणासाठी कोणतीही भूमिका घेत नाही, त्यामुळे आरक्षण मिळेपर्यंत उपोषण करणार असल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, आमरण उपोषणाला आजपासून सुरुवात करत असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे की १४ सप्टेंबर तारखेला मुख्यमंत्री यांनी १ महिन्याचा वेळ मागितला आणि आरक्षण देण्याचा शब्द दिला होता, म्हणून उपोषण सोडलं होतं. आज साखळी उपोषणाचे आज पुन्हा आमरण उपोषणात रूपांतर करत आहे. आता या उपोषणात पाणी आणि औषध उपचार घेणार नाही, असं जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!