Maratha Reservation : गोळ्या घातल्या तरी आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, मनोज जरांगे पाटलांचा इशारा..

Maratha Reservation छत्रपती संभाजीनगर : राज्यात मराठा आरक्षण हा मुद्दा पेटला आहे. तसेच मराठा आरक्षणासाठी पाच महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. आम्हाला मुंबईला जाण्याची हौस नाही; परंतु, सरकार २० जानेवारीपर्यंत आरक्षण देईल याबाबत साशंकता आहे, असे आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी सांगितले. गोळ्या घातल्या तरी आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नसल्याचाही इशारा त्यांनी दिला आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आमचा लढा सुरु आहे. हे आंदोलन आता जनआंदोलन बनले असून ५४ लाख मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळून आरक्षणाचा लाभ मिळेल. Maratha Reservation
परंतु, सरसकट मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ठाम आहे. आता त्यासाठीच मुंबईत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे,’ असे मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. मागील पाच महिन्यापासून आरक्षणासाठी आंदोलन सुरु आहे. आम्हाला मुंबईला जाण्याची हौस नाही; पण सरकार २० जानेवारीपर्यंत आरक्षण देईल याबाबत साशंकता आहे.
दरम्यान, गोळ्या घातल्या तरी आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही. एकदा अंतरवाली सराटी गाव सोडले की आरक्षण घेतल्याशिवाय माघारी येणार नाही. भविष्यात मुलांचे हाल होऊ नयेत, यासाठी सर्वांनी घराबाहेर पडावे, असे आवाहनही जरांगे यांनी मराठा समाजाला केले आहे