Maratha Reservation : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज पुन्हा आक्रमक, ‘या’ दिवशी दिली महाराष्ट्र बंदची हाक…


Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. अशातच आता आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज पुन्हा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. आता महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. सरकराने मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत.

त्याबाबत परिपत्रकही सरकारने काढले आहे. मात्र अजूनही त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यामुळे जरांगे पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसले आहेत, या कायद्याची तातडीने अंमलबजाणी व्हावी यासाठी येत्या 14 तारखेला शांततेमध्ये महाराष्ट्र बंद पाळा, असे आवाहन सकल मराठा समाजाने केले आहे.

दरम्यान, राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चांगलाच पेटला आहे. त्यातच राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनं अधिक तीव्र होत चालल्याचं पाहायला मिळत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला दिलेला शब्द पाळला जात नसल्याने मराठा समाज नाराज आहे. Maratha Reservation

त्याच पार्श्वभूमीवर बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे हा बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी हा बंद असेल. राज्यात मराठा आंदोलानाची धक सध्या वाढत चालली असून हे आंदोलन दिवसागणिक अधिक तीव्र होत चालल्याचे पाहायला मिळत आहे.

त्यातच अनेक ठिकाणी जाळपोळ झाल्याच्या घटना देखील घडत असल्याचं पाहायला मिळत आहे.  राज्यात अनेक ठिकाणी आमदार आणि खासदारांची घरे जाळण्यात आली. मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण सुरु केल्यानंतर राज्यातील गावांमध्ये पुढाऱ्यांना बंदी घालण्यात आली.

त्यामुळे आता जिल्हा बंदची हाक पुकारल्यानंतर राज्यातील वातावरण आणखी बिघडण्याची शक्यता आहे. यामुळे राज्य सरकारला यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा लागणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!