Maratha Reservation : देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आरक्षण आणि एकनाथ शिंदे यांनी दिलेले आरक्षण वेगळे कसे? मराठा आरक्षण प्रकरणी महत्वाची माहिती आली समोर…
Maratha Reservation : गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाच्या सुरु असलेल्या लढ्याला अखेर यश आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला १० टक्के वेगळे आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण देण्यात आले आहे.
यापूर्वी देवेंद्र फडणवीस सरकारनेही मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिले होते. पण ते सर्वोच्च न्यायालयात टिकू शकले नाही. त्यामुळे शिंदे सरकारने दिलेले आरक्षण टिकणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मराठा समाजाला अखेर आरक्षण मिळाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे मराठा समाजाला वेगळे १० टक्के आरक्षण मिळणार आहे. मात्र, सरकारच्या निर्णयाचे स्वागत करत मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसींनाच आरक्षण हवे असल्याचे प्रतिपादन केले आहे. Maratha Reservation
यापूर्वी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले होते. ते आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकू शकले नाही. आता एकनाथ शिंदे यांच्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून शिंदे सरकारचे आरक्षण देवेंद्र फडणवीस सरकारपेक्षा कसे वेगळे आहे, यावर सर्वच जण विचार करण्यास भाग पडले आहेत.
फडणवीसांनी आरक्षण कसे दिले होते?, जाणून घ्या…
मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला होता. त्याला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायम ठेवत शिक्षणात १२ टक्के आणि नोकरीत १३ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला.
उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हानही देण्यात आले होते. त्यावेळी न्यायालय १६ टक्के आरक्षण देऊ शकत नाही. आरक्षणाची मर्यादा १२ ते १३ टक्क्यांपर्यंत खाली आणावी, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.