Maratha Reservation : आंतरवाली सराटीत आज इतिहास घडणार! मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचे नियोजन पाहून थक्क व्हाल, स्वयंसेवक, दवाखाना अन्…
History will be made today in Intervale Sarati

Maratha Reservation जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज जालना येथील आंतरवाली सराटी गावात आज भव्य अशी जाहीर सभा होत आहे. यावेळी मनोज जरांगे यांचे भाषण होणार आहे. मागच्या काही दिवसापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगला चर्चेत आहे. Maratha Reservation

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जालन्यातील मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले होते. मात्र आता त्यानंतर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज जालना या ठिकाणी त्यांची भव्य अशी जाहीर सभा होणार आहे. Maratha Reservation
यावेळी मनोज जरांगे पाटील हे भाषण देखील करणार आहेत. दरम्यान या सभेला मोठा प्रतिसाद मिळत असून या सभेसाठी राज्यभरातून मराठा बांधव आंतरवाली सराटी गावात दाखल होत आहेत.

या सभेची जोरदार तयारी करण्यात आली असून जवळपास ५०० स्वयंसेवक यासाठी तैनात करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या ठिकाणी कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून, दवाखाना, पिण्याचे पाणी, प्रसाधनगृहांची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.
याच संदर्भामध्ये पोलिसांनी देखील सुरक्षा संदर्भात आढावा बैठक घेतली आहे. या सभेसाठी धुळे-सोलापूर महामार्गावरची वाहतूक तीन वेगळ्या मार्गांनी वळवण्यात आली आहे.
आमरण उपोषण मागे घेतल्यावर मनोज जरांगे यांनी १२ दिवसांचा राज्याचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी शेकडो गावात जाऊन सभा घेतल्या आणि प्रत्येक ठिकाणी १४ ऑक्टोबरच्या सभेला येण्यासाठी आमंत्रण दिले होते.
त्यामुळे एक दिवस आधीपासूनच मराठा बांधव आंतरवाली गावात दाखल होतांना दिसत आहे. त्यामुळे आजच्या सभेला लाखोंची गर्दी होण्याची शक्यता आहे. यासाठी त्यानुसार सोय देखील करण्यात आली आहे.
दरम्यान, आतापर्यंत देशांमध्ये कुठेही एवढी गर्दी झाली नसेल एवढी गर्दी या सभेला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे ही सभा आज इतिहास घडवणार असल्याचे देखील बोलले जात आहे.