Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा, क्युरेटिव्ह पिटीशनवर आज होणार सुनावणी, संपूर्ण राज्याचे लागले लक्ष…


Maratha Reservation  : राज्यात सध्या मराठा आरक्षण हा मुद्दा पेटला आहे. मराठा समाजाकडून आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलने सभा, रास्ता रोको करण्यात आले. अशातच आज बुधवार (ता.६) मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात राज्य सरकार व इतरांनी सादर केलेल्या क्युरेटिव्ह याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे.

आजचा दिवस मराठा आरक्षणासाठी अत्यंत महत्वाचा आहे. कारण आज मराठा आरक्षणासाठी दाखल करण्यात आलेल्या क्युरेटिव्ह पिटीशनवर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या दालनात सुनावणी होणार आहे.

महत्वाचे म्हणजे आजच्या सुनावणीत युक्तिवाद होणार नाही. तर फक्त दालनात आज केस पुढे चालवायची की नाही? याचा आज निर्णय होणार आहे. यासाठी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि 3 न्यायमूर्ती उपस्थित राहणार आहेत. Maratha Reservation

तसेच आज सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणावर महत्वपूर्ण सुनावणी होणार आहे. याचिकाकर्ते विनोद पाटील हे या सुनावणीसाठी मराठा आरक्षणाचे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून सुनावणीसाठी दिल्लीला रवाना झाले आहेत.

विनोद पाटील यांनी यावेळी म्हंटले की, आज मराठा समाजाला शंभर टक्के आरक्षण मिळेल. सर्वोच्च न्यायालयात हे आरक्षण टिकले तर आरक्षणाला कोणीही चॅलेंज करू शकत नाही. त्यामुळे मराठा समाजाला आज टिकणारे आरक्षण मिळेल अशी भूमिका विनोद पाटील यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

सर्वांचेच लक्ष निर्णयाकडे…

सर्वोच्च न्यायालयाने मे २०२१ मध्ये मराठा आरक्षणासंदर्भातला एक निकाल दिला होता. तेव्हा मराठा आरक्षण न्यायालयाने फेटाळले होते. त्यानंतर या संदर्भात रिव्हिव पिटिशन दाखल केली गेली. ती देखील न्यायालयाने फेटाळली.

आता क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्यात आली आहे. उद्यापासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. याआधी आता ही सुनावणी होते आहे. अशात आज सर्वोच्च न्यायालयात काय होणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!