Maratha Reservation : मोठी बातमी! मनोज जरांगे यांची तब्येत बिघडली, तब्येत बघून आरोग्यसेविका ढसाढसा रडल्या..
Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यासह गावागावातील मराठा समाजाने उपोषण सुरू केलं आहे. नेत्यांना गावबंदी घालण्यात आली आहे. नेत्यांची वाहने अडवली जात आहेत.
तसेच मनोज जरांगे पाटील हे सध्या आंतरवली सराटी येथे उपोषण करत आहेत. आज त्यांच्या या तिसऱ्या टप्प्यातील उपोषणचा आज सहावा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत चालली आहे. मात्र, मराठा आरक्षणाची मागणी मान्य झाल्याशिवाय आपण पाणी, उपचार काहीही घेणार नसल्याची भूमिका मनोज जरांगेंनी घेतली आहे. Maratha Reservation
आज त्यांच्या या तिसऱ्या टप्प्यातील उपोषणचा आज सहावा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत चालली आहे. त्यांच्या भेटीसाठी एक आरोग्यसेविका पोहोचल्या. यावेळी जरांगे पाटील यांना उपचारांची गरज असल्याचे म्हटले. पण हे सांगत असतानाच त्या आरोग्यसेविकेला आपले अश्रू आवरता आले नाहीत. त्यांना रडू कोसळले.
रडत रडत त्यांनी मनोज जरांगे यांना उपचारांची गरज आहे असे म्हटले आहे. उपोषणाना बसलेल्या मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी राज्यभरातून लोक येत आहेत. अशात एक आरोग्यसेविका त्यांना भेटण्यासाठी आली. तेव्हा मनोज जरांगे यांची अवस्था पाहून त्यांना रडू आव्र्त आले नाही. मी इथंच जीव देईन, माझ्या भावाचा इलाज केल्याशिवाय मी घरी जाणार नाही, असे म्हणत त्या रडू लागल्या.
दरम्यान यावेळी आरोग्यसेविका रडत रडत म्हणाल्या, “ठरवले तर सरकार बैठक घेईन निर्णय घेऊ शकते. पण सरकार तसे करत नाहीये. सरकारला माझ्या भावाला सिरियस करायचे आहे. सरकार मनोज जरांगे पाटील यांना असे निपचित पडलेल बघू शकतं. पण मी माझ्या भावाला असे बघू शकत नाही.
मनोज जरांगे जरी माध्यमांशी बोलत असले तरी त्यांची प्रकृती खालावते आहे. त्यांना उपचारांची गरज आहे. मी कुणाचंही ऐकणार नाही. त्यांनी मला मारले तरी चालेल. मी त्यांचा मार खाईन. पण मी त्यांना दवाखान्यात घेऊन जाणार, त्यांना आयसीयूमध्ये अॅडमिट करणार, असे त्या आरोग्यसेविका यांनी म्हटले आहे.