Maratha Reservation : गुणरत्न सदावर्तेंचा मनोज जरांगेंना थेट विरोध, म्हणाले, मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाविरोधात…

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांचं ज्ञान मला माहित नाही. ते कोणत्या कॉलेजमधून लॉ पास झालेत? कोणत्या विषयात डॉक्टरेट केलीय?, अशा शब्दात वकिल गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे
हिंदुस्थानातील खुल्या वर्गातील जनतेवर अन्याय होणार नाही, ही माझी जबाबदारी आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासंदर्भात लवकरात लवकर आम्ही न्यायालयाचे दार ठोठावू, असे गुणरत्न सदावर्ते म्हणाले आहेत. ज्यांनी या आरक्षणामध्ये पाणी टाकण्याचे काम केले , मराठा जनेतेने कायद्याचे वाचन करावे, हे आरक्षण टिकणारं नाही, असा सल्लाही यावेळी बोलताना गुणरत्न सदावर्ते यांनी दिला आहे.
मराठा आरक्षणाच्या अध्यादेशावर बोलताना गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, देशातील महाराष्ट्रात माझ्यावर अशी जबाबदारी आहे की, खुल्या वर्गातील ब्राम्हण, वैश्य, जैन, मागासवर्गीयांमधील गुणवंत असतील यांच्या अधिकाऱ्यांच्या जागा शाबुत ठेवणं, त्यावर गदा येऊ न देणं, त्यासोबतच खऱ्या मागासवर्गीय जाती आहेत, त्यांची गुणवत्ता एका विशिष्ट स्तरावर आणणे , याची जबाबदारी आमच्यावर आहे. Maratha Reservation
ऐका हो ऐका, जयश्री पाटलांच्या जजमेंटमध्ये स्पष्टपणे सांगितलय, ज्यांच्याकडे सत्ता आहे, ज्यांच्याकडे राजकीय पद आहेत, त्यांच्या बाबतीत आरक्षणाचा विचार करणं किती योग्य आणि किती अयोग्य” असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने जो अध्यादेश काढलाय, त्याला न्यायालयात आव्हान देणार का? या प्रश्नावर गुणरत्ने सदावर्ते यांनी “हो, सोमवारची वाट बघा, लोकांना आपपाल्या घरी जाऊ द्या, सोमवारची वाट बघा, असे उत्तर त्यांनी दिले आहे. यामुळे ते आता काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.