Maratha Reservation : छगन भुजबळ अन् एकनाथ शिंदे एकाच बाजारातले, त्यांच्याविषयी…, मनोज जरांगेंची टीका

Maratha Reservation जालना : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील चांगलेच आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज जालना येथील आंतरवाली सराटी गावात आज भव्य अशी जाहीर सभा होत आहे. Maratha Reservation
राज्यभरातून असंख्य लोक या सभेसाठी जात आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्या सभेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. १०० एकरात होणाऱ्या सभेसाठी सात ते आठ कोटी रुपये खर्च येतो, एवढे पैसे कुठून आले? असा सवाल छगन भुजबळांनी विचारला.
त्यावरून आता मनोज जरांगे पाटील चांगलेच आक्रमक झाले आहेत. तसेच मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे. सरकारने आम्हाला येत्या १० दिवसात आरक्षण द्यावे. एकनाथ शिंदे आणि छगन भुजबळ हे एकाच बाजारातले आहेत.
मला त्यांच्याविषयी काही बोलायचं नाही. ते काय आहेत, हे सगळ्या राज्याला चांगलेच माहीत आहे. भुजबळांचा विषय तर चिल्लर झाल्याने ते बारीक लेकरासारखे काहीही बोलत आहेत. त्यांच्या वयाचा आता ताळमेळ बसत नसेल त्यामुळे ते आता बरळत आहेत, अशी जहरी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.