Maratha Reservation : मोठी बातमी! मराठा समजाला दहा टक्के आरक्षण, मागासवर्ग आयोगाच्या अहवालाला मंत्रिमंडळाची मंजुरी…
Maratha Reservation : मराठा समजाला महाराष्ट्रामध्ये दहा टक्के आरक्षण देण्यात येणार आहे. राज्यातील मागासवर्ग आयोगानं दिलेला अहवालाला मंत्रिमंडळात मंजुरी मिळाली आहे. विशेष अधिवेशनाआधी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मागासवर्ग आयोगाच्या आहवालाला मंजुरी दिली आहे.
थोड्यावेळात एकनाथ शिंदे विधिमंडळ अधिवेशनात मराठा आरक्षणावर बोलतील. मागासवर्ग आयोगाच्या अहवालात मराठा समाज मागस असल्याचेही म्हटले आहे. ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देण्यास आवश्यक असलेली अपवादात्मक परिस्थिती असल्याचेही अहवालात म्हटले आहे. Maratha Reservation
मराठा समाजाला किती टक्के आरक्षण द्यायचं याबाबतचा निर्णय झाल्याची माहिती आहे. मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत १० आरक्षण मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. मराठा समाजाबाबत राज्य मागासवर्ग आयोगाने जे सर्वेक्षण केलं. त्याबाबत राज्य मागासवर्ग आयोगाने अहवाल तयार केला आहे.