Maratha Reservation : मनोज जरांगे यांचे मोठे वक्तव्य, सरकारला इशारा देत म्हणाले, माझा जीव गेल्यावर…
Maratha Reservation : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा जोरदार पेटला आहे. मराठा आरक्षणाबाबत काढण्यात आलेल्या अध्यादेशाची अमलबजावणी करण्याच्या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे यांच्याकडून चौथ्यांदा आंतरवाली सराटीत आमरण उपोषण करण्यात येत आहे.
मराठा आरक्षणाबाबत काढण्यात आलेल्या अध्यादेशाची अमलबजावणी करण्याच्या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे यांच्याकडून चौथ्यांदा आंतरवाली सराटीत आमरण उपोषण करण्यात येत आहे. मनोज जरांगे यांनी यावेळी सरकारवर निशाणा साधला आहे.
ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुम्ही मराठा समाजाची फसवणूक करता. अध्यादेश व सगे-सोयरे बाबत अजूनही कोणताच निर्णय झालेला नाही. अधिवेशन देखील तातडीने बोलावले गेले नाही. कायदा पास होत नाही. माझा जीव गेल्यावर सरकार राहील का? असा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे. Maratha Reservation
दरम्यान, आंतरवली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले असून त्यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर गंभीर टीका केली आहे. त्याचबरोबर यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी अजित पवार यांच्यावर देखील टीका केली आहे. अजित पवार फक्त भुजबळांना वेळ देतात अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे.