Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण द्या! जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न, प्रचंड खळबळ..


Maratha Reservation : आरक्षणासाठी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (Maratha Reservation)

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा होत असताना धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ध्वजारोहणावेळी मराठा वनवासी यात्रेचे संयोजक सुनील लागणे आणि प्रताप कांचन पाटील यांनी अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला.

याप्रकरणी पोलिसांनी सुनील लागणे आणि प्रताप कांचन पाटील यांना ताब्यात घेतले आहे. यावेळी त्यांनी सरकारविरोधातही जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

राज्यात अजूनही मराठा समाजाच्या आरक्षणाचा पेच सुटला नाही. अजूनही याच मुद्द्यावरून मराठा समाजात असंतोष पाहायला मिळत आहे. सरकारने एक महिन्याचा कालावधी दिला असला तरी मराठा समाजाच्या मागण्या मान्य होणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन सुरु केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले, परंतु आरक्षण मिळेपर्यंत ते आंदोलनस्थळावरून हटणार नाहीत. अशातच ही घटना समोर आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!