Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी अजून एक बळी! महाराजांच्या स्मारकासमोरच घेतला टोकाचा निर्णय….


Maratha Reservation : राज्यात आरक्षणाचा मुद्दा तापला असतानाच मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी होत असलेल्या आत्महत्या सत्र सरूच असल्याचे पाहायाला मिळत आहे. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील खामगाव (गोरक्ष)‎‎ येथे आणखी एका मराठा तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे, या ३९ वर्षीय तरुणाने छत्रपती शिवाजी‎ महाराजांच्या स्मारकासमोरच ‎‎विष‎ ‎घेऊन आत्महत्या ‎‎केल्याने खळबळ उडाली आहे.

पुंडलिक राकडे (वय. ३९ वर्ष) असे मराठा‎ आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या ‎तरुणाचे नाव आहे. बुधवारी (ता.१३) रोजी दुपारी ४ वाजेच्या ‎सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. Maratha Reservation

मिळालेल्या माहिती नुसार, मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनात विजय देखील सहभागी होता. मात्र, मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने तो चिंतेत होता.

याच चिंतेत त्याने बुधवारी खामगाव येथील छत्रपती शिवाजी‎ महाराजांच्या स्मारकासमोरच विष घेतले. त्याने विष घेतल्याचे लक्षात येताच गावकऱ्यांनी आणि नातेवाईकांनी त्याला‎ तत्काळ खासगी वाहनातून फुलंब्री येथे‎ रुग्णालयात दाखल केले. Maratha Reservation

दरम्यान, त्याची प्रकृती आणखी बिघडल्याने त्याला ‎रुग्णवाहिकेद्वारे छत्रपती‎ संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात ‎दाखल करण्यात आला. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. तर, मराठा‎ आरक्षणासाठी आपण आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी देखील त्याच्या खिशात आढळून आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!