Maratha Reservation : फक्त तीन दिवसांत शिरूर तालुक्यात सापडल्या १४,६०० कुणबी नोंदी, जुन्या नोंदीची मोहीम जोरात..
Maratha Reservation : राज्यात मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आमरण उपोषण केले. पाठिंबा म्हणून शिरूर तालुक्यात देखील अनेकांनी साखळी तसेच आमरण उपोषण केले. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केल्यानंतर शासनाने तालुकास्तरावर नोंदी तपासण्याचे आदेश दिले.
शिरूर तहसील कार्यालय येथील कक्षात केवळ तीन दिवसात १४ हजार ६०० नोंदी आढळून आल्या आहेत. यामुळे अनेक नागरिकांनी मोठा आनंद व्यक्त केला आहे. मराठा आरक्षण संदर्भात सरकारने कुणबी नोंदी तपासण्याचे आदेश पारित केले आहे.
त्यानुसार शिरूर तहसील येथे विशेष कक्ष स्थापन करण्यात आला असून तेथे तीन दिवसांपासून जुन्या नोंदी तपासल्या जात आहेत. तीन दिवसात कक्षातील गाव नमुना नंबर १४ मधील अधिकाऱ्यांनी १ लाख ३९ हजार इतक्या नोंदी तपासल्या. त्यात १४ हजार ६०० इतक्या नोंदी आढळून आल्या. हे काम मोठ्या गतीने चालू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. Maratha Reservation
मराठा कुणबी अशा नोंदी सापडत असल्याने अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे. यापुढील काळात आम्हाला याचा मोठा लाभ मिळणार असल्याचे बोलताना नागरिकांनी सांगितले.
दरम्यान, मराठा आरक्षणसाठी उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी २ जानेवारीपर्यंत राज्य सरकारला मुदत देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा अशा तीन प्रकारच्या नोंदी शोधण्याचे आदेशित केले आहे.