मराठा आंदोलकांनी केजमध्ये पंकजा मुंडेंची गाडी अडवली..
बीड : लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी प्रचाराला सुरवात केली आहे. मात्र, त्यांना मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहेत.
बीडच्या केज तालुक्यातील पावनधाम येथे अखंड हरिनाम सप्ताहास भेट देण्यासाठी मुंडे गेल्या आसता या ठिकाणी मराठा आरक्षण प्रश्नावर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी घोषणा देणा-या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शेवटी दर्शन करून पंकजा मुंडेना काढता पाय घ्यावा लागला.
पंकजा मुंडे दर्शनासाठी येणार म्हणून काही मराठा आंदोलकांना पोलिसांनी अगोदरच त्याब्यात घेतले होतें. यामुळे चिडलेल्या मराठा समाजाने तीव्र घोषणाबाजी करत गोंधळ घातला. जवळपास २० मिनीटे हा गोंधळ सुरूच होता. पोलिस संरक्षणात मुंडे यांची गाडी काढून देण्यात आली.
Views:
[jp_post_view]